कसारा घाटाची संपूर्ण माहिती Kasara Ghat Information In Marathi

Kasara Ghat Information In Marathi नमस्कार मित्रांनो घाट म्हणलं की आपल्यासमोर उभी राहतात वेडी वाकडी वळणी. व त्याच्यासोबत घाट म्हणलं की अपघात हे आलेच पण दिवसा पाहायचे झाले तर घाट हे खूप निसर्गरम्य दृश्यांनी भरलेले आपल्याला पहावयास मिळतात. संपूर्ण डोंगरदऱ्यातील रस्ते हे घनदाट हिरवाईने नटलेले असतात. पावसाळ्याच्या दिवसातील दृश्य हे अतिशय विहंगमय असते. घाटे पर्यटकांसाठी आकर्षण बिंदू असले तरी घाट हे आपल्या अनेक मुख्य महामार्गांना जोडण्याचे काम करतात.

Kasara Ghat Information In Marathi

कसारा घाटाची संपूर्ण माहिती Kasara Ghat Information In Marathi

 या मार्गाद्वारे अनेक प्रकारची मालवाहतूक केली जाते त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला देखील फायदा होतो. आजच्या लेखात आपण कसारा घाटाबद्दल माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो कसारा घाटाचे नाव ऐकले की सर्वप्रचलित कथा डोळ्यासमोर येतात त्या कथा म्हणजे भुताखेताच्या कथा. साधे गुगल किंवा युट्युब वर आपण कसारा घाट असे टाकले की सर्व लोक आपले कसारा घाटातील भयानक प्रसंग सांगताना आपल्याला दिसतात. हे कितपत खरं आहे याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही कारण हा प्रत्येकाचा आपला वैयक्तिक विचार असतो. पण दिवसा पाहायला गेले तर कसारा घाट हा निसर्गाचा अद्भुत चमत्कारच आहे असे म्हणावे लागेल.

मुंबईच्या मार्गे जर तुम्ही नाशिकला जायला निघालात तर तुम्हाला वाटेत कसारा घाट लागतो. या घाटाचे प्राचीन नाव म्हणायचे झाल्यास त्याला थळघाट असे देखील म्हणत. या घाटाच्या उंची बद्दल बोलायचे झाले तर याची उंची सुमारे दोन हजार फूटच्या आसपास आहे. जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुम्ही आजूबाजूच्या निसर्गाचा मनमोकळे मनाने आनंद घेऊ शकता. भारतामधील रेल्वे मार्गांपैकी अत्याधिक वेगवान रेल्वे मार्ग म्हणावयाचा झाल्यास कसारा घाटातील रेल्वे मार्ग अनुभवास मिळतो.

 घाटाची चढाई करत असताना आपल्याला घाटाच्या डाव्या बाजूस दरी पहावयास मिळते तर घाटाच्या उजव्या बाजूस उंच उंच डोंगर पहावयास मिळतात. या वळणावरून जात असताना जसा इग्लूचा आकार असतो त्याप्रमाणे दगडी बांधकाम केलेले आपल्याला पाहावयास मिळते. पण जर तुम्ही खाजगी गाडीने जात असाल तर घाटात थांबणे खूप धोकादायक आहे कारण दरडी कोसळण्याची घटना या घाटात वारंवार घडत असते.

 कसारा घाटाच्या आजूबाजूला जवळच्या भागांमध्ये तुम्हाला त्रिंगलवाडी टेकडी व बलवंतगड असे प्रसिद्ध पर्यटन स्थळे देखील पाहायला मिळतात. कसारा घाटाची लांबी ही सुमारे कल्याण पासून ६८ किलोमीटर  असल्याचे महामार्ग विभागातर्फे सांगण्यात येते.

पावसाळ्यामध्ये या ठिकाणी प्रचंड धोधो पाऊस कोसळतो त्यामुळे बातम्यांमध्ये सतत कसारा घाटामध्ये दरडी कोसळल्याच्या बातम्या आपल्याला पहावयास मिळतात. काही बेभान पर्यटक हलगर्जीपणामुळे या घाटामध्ये आपला जीव देखील गमावतात. घाट इतक्या वेड्यावाकड्या वळणांचा आहे की या ठिकाणी हरवलेल्या किंवा दरीत पडलेल्या लोकांचे शोध कार्य करायचे म्हणजे खूप जिकरीचे कार्य बनते.

 पावसाळ्यात कसारा घाटामध्ये अनेक वेळा रस्ता बंद ठेवावा लागतो याचे मुख्य कारण म्हणजे धुके. धुक्यामुळे अनेक वेळा समोरील रस्ता दिसत नाही.

 कसारा घाटाच्या नैसर्गिक सौंदर्य बद्दल अधिक बोलायचे झाल्यास या परिसरात भावली धरण तुम्हाला पहावयास मिळेल. त्या धरणाजवळ अनेक लहान-मोठे धबधबे देखील आहेत. वैतरणा नदी मार्गावरील प्रदेश हा हिरवाईने नटलेला असून येथे घाटनदेवी मंदिर देखील आहे.

कसारा घाटामध्ये घाट परिसरात प्रवेश करताना महामार्गावरील रस्त्यावर आपल्याला इगतपुरी नावाचा तालुका पहावयास मिळतो. हा तालुका म्हणजे निसर्गाची देणगीच म्हणावी लागेल. या तालुक्यामध्ये आपल्याला अनेक पर्यटन स्थळे पहावयास मिळतात त्यामुळे घाट परिसरात प्रवेश करताना पर्यटक येथे थोडे विसावा घेतातच. तर या तालुक्यामध्ये आपल्याला कळसुबाई शिखर, भंडारदरा डोंगर, अलंग डोंगर, कुरुंगवाडी, त्रंबकेश्वर धार्मिक देवस्थान, सुप्रसिद्ध रंधा धबधबा इत्यादी स्थळे पहावयास मिळतात.

भंडारदरा या स्थळाबद्दल बोलायचे झाले तर अकोला तालुका अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोडतो. तेथे भंडारदरा नावाचे एक गाव वसलेले आहे. हे गाव सुप्रसिद्ध प्रवरा नदीकाठी असून नदीमुळे या गावाचे सौंदर्य आणखीनच फुलून आलेले आहे. हिरवाईने नटलेले डोंगर या गावच्या सुंदरतेमध्ये आणखीच भर घालताना आपल्याला पहावयास मिळतात. पर्यटकांच्या दृष्टीने गावात अनेक सुविधा देखील उपलब्ध आहेत.

आपण आपल्या खाजगी वाहनाने नाशिक मुंबई महामार्गावरून भंडारदरा येथे पोहोचू शकतो. तसेच रेल्वेने देखील मुंबई मध्य रेल्वेच्या माध्यमाने आपण प्रवास करू शकतो.  रेल्वे स्थानकावर किंवा बस स्थानकावर उतरून आपण टॅक्सी च्या मदतीने भंडारदरा येथे पोहोचू शकतो.

 त्यानंतर मार्गावरील सुप्रसिद्ध स्थळ म्हणजे कळसुबाई शिखर होय. कळसुबाई शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असून त्याची उंची १६४६ मीटर इतकी उल्लेखनीय आहे. या कळसुबाई शिखराला महाराष्ट्राचे माउंट एवरेस्ट असे देखील संबोधले जात असते.

समुद्र सपाटीपासूनच्या उंचीचे बोलायचे झाले तर सुमारे ५४०० फूट इतकी उंची आपल्याला पहावयास मिळते. तुम्हाला कळसुबाई शिखर सर करायचे असेल तर तुम्ही सकाळीच सुरुवात करावी. कळसुबाई हे नाव पडण्यामागे एक खूप विलक्षण अशी कथा प्रचलित आहे. ती म्हणजे कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या गावात कळसुबाई नावाची एक महिला राहत होती. ती या गावची सून होती.

दैवी देणगी प्रमाणे तिला तेथील जंगलात सापडणाऱ्या औषधी वनस्पतींची माहिती असल्यामुळे ती अनेक रोगांवर गुणकारी औषध बनवण्यासाठी खूप प्रसिद्ध होती. सर्व गावकऱ्यांची सेवा करायची. तेथील गावातील लोक तिला देवता मानू लागले त्यामुळे कळसुबाई या स्त्रीच्या स्मृती प्रित्यर्थ या भव्य डोंगराला तिचे नाव देण्यात आले असल्याचे सांगितले जाते.

 या मार्गावरील पुढील पर्यटन स्थळ म्हणजेच अमृतेश्वर मंदिर होय. भंडारदरा आधीचे पर्यटन स्थळ आपण पाहिले तिथपासून सुमारे २२ किलोमीटर इतके अंतर पार केल्यावर सुप्रसिद्ध अमृतेश्वर मंदिर आपल्याला पहावयास मिळते. या मंदिराची ख्याती अशी आहे की हे मंदिर आदिवासी जमातीतील कोळी महादेव या जमातीच्या देवाला समर्पित आहे.  या मंदिराचे संपूर्ण बांधकाम दगडाच्या सहाय्याने झालेले आहे व मंदिराच्या भिंतीवर आपल्याला सुंदर नक्षीकाम केलेले पहावयास मिळते. या मंदिराच्या गाभाऱ्यांमध्ये सुबक शिवलिंग आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर येथे अनेक पुरातन शिल्प देखील आपल्याला पहावयास मिळतात.

कसारा घाट मार्गावरील आणखी एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणजे रंधा फॉल होय. शेंडी हे एक छोटेसे गाव आहे या गावापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर रंधा हा सुप्रसिद्ध विलक्षण धबधबा आपल्याला पहावयास मिळतो.

 कधीकधी प्रशासनाला निसर्गाच्या रौद्ररूपापुढे नाईलाजास्तव तेथील पर्यटनाची वरदळ बंद करावी लागते. पावसाळ्यात हा धबधबा जितका मोहक दिसतो तितकाच हा धबधबा रौद्ररूप देखील धारण करतो.

 आता आपण कसारा घाटातील निसर्ग सौंदर्य बद्दल संपूर्ण माहिती पाहिली पण आता आपण कसारा घाटातील भयंकर विषयाबद्दल म्हणजेच भुताखेताच्या प्रचलित गोष्टींबद्दल थोडीशी माहिती पाहूयात. अनेक लोक असे मानतात की कसारा घाटातील दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे व तेथील अपघातांमुळे तेथे अनेक अतृप्त आत्मे आहेत. असे लोकांचे म्हणणे आहे अनेक पॅरानॉर्मल एक्सपर्ट्स देखील येथे जाऊन त्या गोष्टीचा खुलासा करत आहे.

अनेक लोक youtube वर किंवा अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर  रात्रीच्या वेळच्या घाटातील आपल्या सोबत घडलेल्या भयंकर गोष्टी शेअर शेअर करत असतात. त्यामुळे अनेक वेळा लोकांद्वारे किंवा प्रशासनाद्वारे असे आव्हान केले जाते की कसारा घाट मार्गे रात्रीचा प्रवास टाळावा. असे सांगण्यामागचे अजून एक मुख्य कारण म्हणजे वेडी वाकडी वळणाची वाट असल्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणे थोडे धोक्याचे ठरते, त्यामुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढते त्यामुळे जर तुम्हाला कसारा घाट मार्गे म्हणजेच नाशिक किंवा मुंबईला जायचे असेल किंवा त्या मार्गावरील पर्यटन स्थळांना भेट द्यायची असेल तर तुम्ही सकाळी प्रवास करणे योग्य ठरेल.

 तर मित्रांनो आजच्या या लेखात आपण कसारा घाटाबद्दल जी काही माहिती पाहिली ती आपणास कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवा व ही माहिती आपल्या आत्ताच आप्तस्वकीयांपर्यंत नक्की पोहोचवा.

 धन्यवाद!!!!

FAQ

कसारा घाट कुठे आहे?

मुंबईच्या ईशान्येस १२० किलोमीटर अंतरावर असलेला कसारा घाट, मुंबई आणि नाशिक या प्रमुख महाराष्ट्रीय शहरांमधील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतो. हे समुद्रसपाटीपासून अंदाजे ६०० मीटर उंचीवर वसलेले आहे आणि सुमारे ११ किलोमीटर क्षेत्र व्यापते.

कसारा म्हणजे काय?

कसाराचा अर्थ आहे : तलाव, तलाव . लिंग. मुलगा. मूळ. भारतीय, संस्कृ

कसारा घाट सुरक्षित आहे का?

या वर्षी या मार्गावर अपघात होऊन २४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे , अशी माहिती महामार्ग पोलिसांच्या नाशिक विभागाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे. रॅश ड्रायव्हिंग हे अपघातांचे प्रमुख कारण असले तरी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालकांना वाहन चालवणे कठीण होते.

कसारा घाट की ऊंचाई कितनी है?

585 मी

Leave a Comment